• info@anamprem.org
  • 7350013801 / 9011670123

अनामप्रेमी कोरोना योध्ये; मुंबईच्या मनपा सेवेत स्वेच्छेने कोरोना युद्धात अखंड कार्यरत

Start time 2020-05-01
Finished Time 2024-10-21 21:31
Content

कोरोनाचा विळखा घट्ट होताना कोरोनाला संपवणारे शूर देशात लढत आहेत. यात स्वेच्छेने ‘जबाबदारी प्रथम’ हे ब्रीद अंगी बाणवलेले अनामप्रेम चे माजी विद्यार्थी मुंबई महानगपालिकेत अविरत काम करीत आहेत. कोरोना युद्ध सुरू झाले, नैसर्गिकरित्या अनेक जण मुंबई येथील मायानगरीतुन जमेल तसे आपापल्या घरी परतले. परंतु मुंबई मनपाच्या नोकरीचे कर्तव्य काहीही झाले तरी पार पाडायचे या भावनेने अनामप्रेम चे माजी विद्यार्थी मुंबई मनपाच्या विविध विभागात या कोरोनाच्या कठीण काळात कर्तव्य बजावत आहेत. यामध्ये सोमनाथ शिवाजी घाडगे(अल्पदृष्टी), कार्तिक बाळू पांडव(अल्पदृष्टी), सतीश नवनाथ खळगे(अस्थिव्यंग), अण्णा बारकू पवार(पूर्णतः अंध), विशाल संजय सांगळे(अल्पदृष्टी) हे अनामप्रेम चे माजी विद्यार्थी मनपा सेवेत कोरोना च्या लढ्यात लढत आहेत. अशा सर्व कार्यरत दिव्यांगांचे डॉ.गिरीश महादेव कुलकर्णी, डॉ.प्रकाश शेठ, डॉ.रवींद्र सोमाणी, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ.नरेंद्र वानखेडे, प्रवीण रमेश बोरा, इंजि. अजित माने, इंजि. राधा मिलिंद कुलकर्णी ,इंजि. इकबाल सय्यद, दीपक बुरम यांनी या योध्याचे कौतुक केले आहे. त्याचा परिचय थोडक्यात करून देत आहोत.

सोमनाथ शिवाजी घाडगे (अल्पदृष्टी): (9096495788)

बी.ए. शिक्षण पूर्ण केलेला हा सोमनाथ मूळचा सोलापूर जिल्ह्यातील हतीद ता.सांगोला येथील आहे. 2012 साली तो नगरला 8 वी नंतर पुढील शिक्षण घेण्यास आला. शेतकरी कुटुंब व वडिलांचे छत्र नसलेल्या सोमनाथने कष्टाने शिक्षण घेतले. वयाच्या 19 व्या वर्षी सन 2017 ला मुंबई मनपात आरोग्य विभागात अनामप्रेम च्या माध्यमातून त्याने नोकरी मिळवली. कोरोनाच्या या प्रकोपात देखील सोमनाथ घाडगे हा मालाड (प) येथील मनपा आरोग्य विभाग येथे ऑफिस असिस्टंट म्हणून काम करीत आहे. कोरोनाचा सर्व डेटा सांभाळणे ही जबाबदारी तो पार पाडत आहे. रोज राहत्या घरापासून पायी ऑफिसला जाणे, दिवस रात्र काम करणे हा त्याचा दिनक्रम 15 मार्च पासून आहे. 15 मार्च पासून आज अखेर एकही सुट्टी सोमनाथने घेतली नाही. सोमनाथची आई व भाऊ गावाकडून सोमनाथची काळजी करीत असले तरी सोमनाथ नोकरीला प्राधान्य देत आहे.

कार्तिक बाळू पांडव (अल्पदृष्टी): (9860577297)

औरंगाबाद जिल्ह्यातील कसाब खेडा या छोट्या गावातील कार्तिक पांडव हा मुलगा आहे. त्यास 2017 ला मुंबई मनपात अनामप्रेम माध्यमातून नोकरी मिळाली. त्याचे आई -वडील शेतकरी आहेत. कार्तिक स्वतः दिव्यांग असूनही वयाने मोठा असल्याने मिळालेली नोकरी करणे त्यास गरजेचे होते,यामुळे तो मुंबईत मागील 3 वर्षात स्थिरावला. मुंबई मनपाच्या मरीन लाईन्स येथील चंदन वाडी येथील मनपा कंट्रोल रूम ला फोन ऑपरेटर म्हणून कार्तिक काम करीत आहे. कार्तिक च्या कामाचे कोरोनाच्या आपत्तीत स्वरूप खूप महत्वाचे झाले आहे. या काळात कोरोना बाधित, कोरोना लक्षणे असणाऱ्या पेशंट यांच्याशी फोनद्वारे बोलणे, त्यांची माहिती संकलित करणे,गरजूंना रुग्णवाहिका फोनद्वारे उपलब्ध करून देणे, विलगिकरण केंद्रात संशयित पाठवण्याचे नियोजन करणे आदी अनेक कामे कार्तिक आनंदाने सांभाळत आहे. अत्यंत धाडसी असणारा हा कार्तिक कोरोना च्या काळात न घाबरता, न पळून जाता स्वतःचे काम केले पाहिजे असे म्हणतो आहे. त्याच्या घरच्यांना कार्तिकची काळजी वाटत असली तरी तो व्हिडीओ कॉल द्वारे दिवसातून 3 वेळा घरी संपर्कात राहत आहे.

सतीश नवनाथ खळगे(अस्थिव्यंग): 7387828676

नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कापरेवाडीचा सतीश हा मुलगा आहे. स्पर्धा परिक्षेमधून मोठी पोस्ट मिळवायची या ध्येयातून अनामप्रेम ला वर्ष 2014 ला आला होता. 2017 च्या मुंबई मनपाच्या भरतीत तो निवडला गेला. सध्या तो मालाड (प) येथील मनपा उपायुक्त यांचा कक्ष सेवक म्हणून काम करीत आहे. कोरोनाची भीती न बाळगता कणखरपणे कोरोनाला तोंड दिले पाहिजे अशी त्याचे मनोधैर्य आहे. याबाबत तो सतत त्याचे सहकारी व मित्र असे सर्वांना फोनद्वारे धाडस वाटत आहे. या लॉक डाऊन काळात एकही सुट्टी न घेता सतीश हा अखंड काम करीत आहे.

अण्णा बारकू पवार(पूर्णतः अंध); 8530636460

अहमदनगर तालुक्यातील आलमगीर शेजारील ब्रह्म तळे येथील अण्णा हा रहिवासी आहे. अनामप्रेम चा पहिल्या तुकडीचा विद्यार्थी आहे. 10 वर्षे तो अनामप्रेम मध्ये निवासी शिक्षण घेत होता. अत्यंत कष्टाळू व धाडसी असणारा हा मुलगा पूर्णतः अंध असूनही कशातच कमी नाही. सध्या तो मुंबई मनपात घाटकोपर येथील पाणी विभागात काम करीत आहे. कोरोनाच्या काळात मरण व लागण असली भीती न बाळगता कर्तव्य हेच अंतिम ध्येय आहे, असे तो म्हणत आहे.

अनामप्रेम चे हे योध्ये संपूर्ण स्वतःची काळजी घेत ,स्वतः दिव्यांग असूनही मुंबई मनपात अविरत काम करून कोरोनात कर्तव्य प्रवृत्त करून सर्वांना प्रेरणा देत आहेत. या सर्व दिव्यांग कोरोना योध्ये यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.